सुधीर मुळे
रहस्यकथा आणि विनोदाच्या माध्यमातून सामाजिक, कौटुंबिक प्रश्नांचा वेध!
लेखकाविषयी
सुधीर मुळे हे मुख्यतः कादंबरीकार आहेत. परंतु ते कथाही लिहितात. सामाजिक समस्या चटकदार पद्धतीनं मांडून वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
विनोदी कथा लिहिण्यातही त्यांचा हातखंडा आहे. गंभीर स्वरूपाचे सदर-लेखनही ते करत असतात. रहस्यकथा आणि भयकथा हाही त्यांच्या लेखनाचा भाग आहे. ते व्यंगचित्रकारदेखील आहेत.
आकाशवाणी सोलापूर आणि अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) येथून त्यांच्या सामाजिक, रहस्यकथा आणि विनोदीकथा प्रसारित झाल्या आहेत. रोटरी क्लब,अहिल्यानगर , रिमांड होम,सोलापूर, अ.भा.म.सा.प. साहित्य संमेलन (वणी), कलाविकास मंडळ (विटा), आणि टिळक स्मारक महिला मंडळ (खामगाव) येथे कथाकथन सादर.
‘स्टोरीटेल’ वर त्यांची ’सणसणाट’ ही ऑडिओ कथा उपलब्ध आहे. त्यांच्या ‘ह्यूमन गॅरेज’ या कथेचे एकांकिकेत रूपांतर झाले आहे.
लेखन प्रसिद्ध झालेली नियतकालिके
विशेष उल्लेख
- 'मिळून साऱ्याजणी' आयोजित रेऊ कथास्पर्धा: सर्वोत्कृष्ट कथा
- श्रीसमर्थ पुस्तकालय आणि लोकमान्य वाचनालय (मालाड, मुंबई) कथास्पर्धा विजेता
- IPUSTAK SONIC OCTAVES (मुंबई) लघुकथास्पर्धा: उल्लेखनीय कथा
- जिल्हा ग्रंथालय व जिव्हाळा प्रतिष्ठान (अहमदनगर) विनोदी कथास्पर्धा पुरस्कार
- लोकमत दिवाळी अंक कथास्पर्धा आणि लोकव्रत प्रकाशन (पुणे) कथालेखन स्पर्धेत द्वितीय क्रमांक
- दै. पुढारी (कोल्हापूर) आयोजित विनोदी कथास्पर्धेचे परीक्षक.
- म.सा.प. जुळे सोलापूर शाखेचे माजी कार्यकारिणी सदस्य.

प्रेरणास्थान — सुहास शिरवळकर
मराठी साहित्यात अनेक प्रकारचे प्रवाह आहेत. सुहास शिरवळकर उर्फ सुशि हे एका प्रवाहाचे प्रमुख प्रतिनिधी आहेत. गेली कित्येक वर्षे त्यांच्या साहित्याची जादू अबाधित आहे. प्रत्येक पिढीतील असंख्य तरुणांची अभिरूची त्यांच्या अनेक कादंबऱ्यांमुळे घडली आहे, अजूनही घडत आहे.
त्यांच्या लेखनामुळे केवळ वाचकच तयार झाले असे नव्हे, तर त्यांच्या लेखनापासून प्रेरणा घेऊन अनेक लेखकही निर्माण झाले. सुशिंना मानाचा मुजरा!
पुस्तके खालील वेबसाईटवरही उपलब्ध आहेत
निवडक पुस्तके
सर्व पहानवीन प्रकाशित
सर्व पहाआगामी पुस्तके
झाकली मूठ
चंदू चटोर आणि इतर पात्रांच्या विनोदी कथा. या कथा या पूर्वी दै. पुढारीच्या रविवारपुरवणीतून प्रसिध्द झाल्या आहेत. पार्टनर पब्लिकेशन, विरारने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
नवीन व्हिडिओ
सर्व पहाकाजवा (डिटेक्टिव्ह कबीर सरदेसाई कथा)
क्षणचित्रे
मास्टर की २०२६ या दिवाळी रहस्यकथा दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन प्रसंगी पुणे येथे मुख्य संपादक मा.श्री. योगेशजी दशरथ, संपादक मा. श्री. सम्राटजी शिरवळकर , ज्येष्ठ साहित्यिक मा. श्री. संजयजी सोनवणी आणि मेनका मिडीयाचे आणि जत्रा दिवाळी अंकाचे संपादक मा. श्री. अभप्रकाशन समारंभ · 19 Oct 2026
कला विकास मंडळ, विटा (सांगली) यांच्या हीरक महोत्सवी कार्यक्रमात माजी आमदार कै. अनिलजी बाबर आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. तात्यासाहेब कोरे यांचेसह कथाकथन करताना लेखक श्री. सुधीर मुळेसांस्कृतिक कार्यक्रम · 01 Oct 2023
कला विकास मंडळ, विटा (सांगली) यांच्या हीरक महोत्सवी कार्यक्रमात कथाकथन करताना लेखक श्री. सुधीर मुळेसांस्कृतिक कार्यक्रम · 01 Oct 2023
’एक सेकंद लेट!’ या कादंबरीचे प्रकाशन करताना ज्येष्ठ कवी कै. श्री. दत्ताजी हलसगीकर , ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि इतिहासतज्ञ श्री. संजयजी सोनवणी यांच्यासह लेखक सुधीर मुळे त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अर्चना सुधीर मुळे यांच्यासह.प्रकाशन समारंभ · 09 Nov 2010
पुस्तक परीक्षणे
पुस्तक परीक्षणे
पुस्तक परीक्षणे
पुस्तक परीक्षणे 
सुधीर मुळे वाचक परिवार
आदरणीय वाचक,
माझ्या दै. पुढारीमधील ’लवंगी फटाके’ या सदरातील लेखनावर , दै. लोकसत्ता, लोकमत, तरूणभारत आणि दिवाळी अंक इत्यादीमध्ये प्रकाशित झालेल्या कथांवर तसेच माझ्या पुस्तकांवर दिलेल्या आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार. आपल्या प्रतिक्रिया माझ्या साहित्यप्रवासासाठी प्रेरणादायी ठरल्या आहेत.
आपल्यासोबत सातत्यपूर्ण संवाद साधण्यासाठी आणि साहित्यिक विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी मी " Words With Sudhir Muley" हा WhatsApp समूह सुरू केला आहे.
या समूहात –
लेखन वाचन आणि विश्लेषण
संवाद व चर्चासत्रे
सर्जनशील उपक्रम
साहित्यविषयक माहिती व नव्या घडामोडी
इत्यादींचा समावेश असेल.
आपण या समूहाचा भाग व्हाल अशी अपेक्षा आहे.
सुधीर मुळे वाचक परिवाराच्या व्हॉटस ॲप ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी बाजूला दिलेला क्यू आर कोड स्कॅन करा किंवा खाली दिलेल्या हिरव्या बटनवर क्लिक करा किंवा info@sudhirmuley.com या इमेल ॲड्रेसवर तशी इमेल पाठवा.
संपर्क साधा
पुस्तक खरेदी, कार्यक्रम, मुलाखत किंवा अभिप्रायासाठी संपर्क करा.